मुंबई : पंकज अडवाणीने सलग तिसर्यांदा बिलियर्ड्स क्लासिक मुंबई जिंकले. उत्कृष्ट क्यूइस्ट (बिलियर्ड्स आणि पूल) पंकज अडवाणीने अंतिम सामन्यात ध्रुव सितवालाचा ५-२ असा पराभव करून तिसरे सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक विजेतेपद जिंकले आहे. त्याने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्येही हे विजेतेपद जिंकले होते. अडवाणीने सितवालाचा १०-१५०, १५०-१४८, ८१-१५०, १५०-९६, १५०-१३६, १५०-१४७, १५०-१३७ असा पराभव केला. रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या तीन फ्रेम्समध्ये अडवाणी त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपासून खूप दूर होता पण अडवाणीने चौथी फ्रेम जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर त्याने पुढील तीन फ्रेम जिंकून आपला विजय निश्चित केला आणि २.५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली.उपविजेत्या सितवालाला १.५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अडवाणी म्हणाला, हा विजय माझ्यासाठी खास आहे.
Fans
Followers